सौ. फडणवीसांनी गायले व्हॅलेंटाईन डे निमित्त गायले इंग्रजी गाणे


आजपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रम आणि म्युझिक अल्बमधून गाताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आपण पाहिले आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त नुकतेच त्यांनी एक इंग्रजी गाणे गायल्याचे समोर आले आहे. गाण्याचा व्हिडीओ खुद्द अमृता यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पण नेटकऱ्यांच्या पसंतीला त्यांचे हे गाणे उतरले नसल्याचे दिसत आहे. त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.


१४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त अमृता फडणवीसांनी गायलेल्या गाण्याचा मुळ गायक lionel richie आहे. अमृता यांनी या २ मिनिटे १७ सेकंदाच्या अल्बममध्ये स्वत:च्या अंदाजात गाणे गायल्याचे दिसत आहे. त्या अत्यंत सुंदर अल्बममध्ये दिसत आहेत.

lionel richieने १९८३ मध्ये अमृता यांनी गायलेले हे गाणे गायले आहे. हे गाणे त्यांना फार आवडत असल्याने स्वत:च्या स्टाईलमध्ये रेकॉर्ड करुन त्यांनी अल्बम शूट केला. त्यांनी गायलेले हे गाणे कव्हर व्हर्जन आहे. त्यांनी यापूर्वी ही अनेक गाणी गायली होती. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांनी एक अल्बम रेकॉर्ड केल्याचे म्हटले जाते. पण त्यांना या अल्बममुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Leave a Comment