शासकीय बंगला मिळत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री नाराज


पुणे – माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय बंगला मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले की, मुंबईत बारामतीतील कार्यकर्ते कामानिमित्त आले की, मी नाराज होतो. कारण माझे मुंबईतील घर लहान आहे. जयच्या बेडरुमध्ये येणाऱ्या लोकांना बसवावे लागते. आता लोक माझ्याच बेडरुमध्ये बसायचे बाकी राहिले आहेत. तिथे लोकांना बसवले की, बायको मला बाहेर हाकलूनच देईल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. १०० दिवस सरकार येऊन होत आले तरी शासकीय बंगला रिकामा होईना, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारी निवास मिळत नसल्याने खंत व्यक्त केली.

१०० दिवस महाविकास आघाडीचे सरकार येऊन झाले तरी काय करतो बाबा कुणास ठाऊक अशा शब्दात अजित पवार यांनी शासकीय निवासस्थान रिकामे होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. मुळात आत्ताच घर लहान आहे. येणाऱ्या लोकांना जयच्या बेडरूममध्ये बसवावे लागते. आता तर माझ्या बेडरूममध्ये लोकांना बसवायचे बाकी राहिल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी यावेळी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करा, अन्यथा सिंगल वोटींगवर निवडून येणाऱ्या संचालकाचा जागेवर राजीनामा घेऊ, असा इशाराही दिला. त्याचवेळी निवडणुकी दरम्यान काहीजण गमतीजमती करतात. त्यांनी आता थांबावे, अन्यथा आपण गमती जमती सुरु केल्यातर मदतीलाही कोणी येणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

Leave a Comment