व्हायरल: लॅम्बोर्गिनीची ट्रॅफिक पोस्टला धडक

बंगळुरू येथे लग्झरी कार लॅम्बोर्गिनी गॅलाराडो चालकाचा ट्रॅफिक पोस्टला धडक देतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एवढेच नव्हे तर चालकाने या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर अपलोड केले होते. मात्र नंतर ते डिलीट करण्यात आले आहेत.

6 सेंकदाच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हिरव्या रंगाची लॅम्बोर्गिनी काळ्या रंगाची ऑडी आणि पांढऱ्या रंगाच्या पोर्शेसोबत तुफान वेगात रस्त्यावर धावत आहे. मध्येच लॅम्बोर्गिनी चालक टर्न घेतो व थेट ट्रॅफिक पोस्टला धडक देतो.


(सौजन्य – एनडीटिव्ही)

या धडक दिलेल्या आरोपीचे नाव सनी सभ्रवाल असून, तो बंगळुरू येथे एका मनोरंजन पार्कच्या मालकाचा मुलगा आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये सनी पोस्ट ऑफिससोबत फोटो काढताना दिसत आहे.

पोलिसांनुसार, आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. तसेच, त्याला जामीन मिळाला आहे. कार जप्त करण्यात आली आहे.  नुकसान झालेले ट्रॅफिक पोस्ट दुरूस्त करण्यात आले आहे.

Leave a Comment