नेहा आणि आदित्यच्या ‘गोवा बीच’ गाण्याला मिळत आहे तुफान प्रतिसाद


14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणाऱ्या लग्नसोहळ्यामुळे गायिका नेहा कक्कड आणि आदित्य नारायण ही जोडी सध्या बरीच चर्चेत आहे. त्यातच आता या जोडीचे ‘गोवा बीच’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहेत. सध्या त्यांचा ‘गोवा बीच’ या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

हे गाणे टोनी कक्कड आणि नेहाने गायले असून नेहा या गाण्यात पुरुषांना लुटणारी दाखवण्यात आली आहे. नेहा आणि आदित्य सध्या बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर आलेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. १० फेब्रुवारीला ‘गोवा बीच’ हे गाणे रिलीज झाले. गाणे रिलीज झाल्यानंतर काही तासातच १० लाख व्यूव्ह्ज मिळाले आहेत.

गायिका म्हणून बॉलिवूडमध्ये नेहा कक्कड चांगलीच स्थिरावली आहे. तिने २००६ च्या ‘इंडियन आयडॉल’मध्ये भाग घेतला होता. ती सध्या या शोची जज आहे. तिने यापूर्वी हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्याची बातमी सोशल मीडियावरुन दिली होती. सध्या तिच्या आणि आदित्यच्या नात्याची चर्चा आहे.

Leave a Comment