किर्तनातील वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज अडचणीत


अहमदनगर – एका किर्तनातील वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख हे अडचणीत येण्याची शक्यता असून ‘पीसीपीएनडिटी अ‌ॅक्ट’नुसार (प्रसूतिपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायदा) त्यांनी केलेले वक्तव्य अपराध आहे. त्यामुळे, अहमदनगरच्या पीसीपीएनडिटी सल्लागार समितीने त्यांच्याविरोधात नोटीस काढली आहे.

त्यांनी एका कीर्तनात सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे वक्तव्य केले होते. इंदुरीकर महारांजावर त्यांच्या या वक्तव्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते.

पीसीपीएनडिटीच्या सल्लागार समितीने संबधित वक्तव्य असलेल्या कीर्तनाचे प्रसारित व्हिडीओ आणि वृत्तपत्रातील बातम्यांवर इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इंदुरीकरांच्यावतीने याला अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

Leave a Comment