दीपिकासाठी ‘महाभारत’ हा चित्रपट सर्वात महत्त्वकांक्षी चित्रपट


‘महाभारत’ या आगामी चित्रपटात द्रोपदीची भूमिका बॉलीवूडची डिंपल गर्ल अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोण साकारणार आहे. द्रोपदीच्या दृष्टीकोनातून हा चित्रपट असेल. सध्या पती रणवीर सिंगसोबत अज्ञात ठिकाणी दीपिका सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने एका आघाडीच्या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुट्टीवर जाण्यापूर्वी हा खुलासा केला होता. निर्माता मधु मन्टेना यांच्याशी पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटासाठी दीपिकाने हातमिळवणी केली आहे. या चित्रपटाची ती सहनिर्माती असेल. महाभारताची कथा द्रोपदीच्या दृष्टीकोनातून पडद्यावर मांडण्यात येणार आहे.

याबाबत दीपिका म्हणते, महाभारत बनवणे इतर चित्रपटांसारखे नाही. यासाठी निर्मितीच्या स्केलपासून ते बजेट, वेशभूषा राजपट याकरिता वेळ द्यावा लागणार आहे. हे कमी वेळात पूर्ण करणे शक्य नाही. हा माझा महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. यासाठी मी बराच विचार केला. छपाकच्या प्रमोशनमध्ये मी गुंतली होते. त्यामुळे यावर चर्चा करायला वेळ मिळाला नाही. आम्ही अद्याप कास्ट आणि क्रू यावर विचार केलेला नाही.

Leave a Comment