हरणांना घरात खायला दिल्याने महिलेला बसला हजारोंचा दंड

अमेरिकेच्या कोलोराडो येथील एका महिलेला विचित्र कारणासाठी दंड ठोठवण्यात आला आहे. तीन हरणांना घरात बोलवून खायला दिल्याने महिलेला तब्बल 550 डॉलर (जवळपास 39,200 रुपये) दंड ठोठवण्यात आला आहे.

लोरी डिक्शन यांच्या घरामागे हरिण आले होते, त्यामुळे महिलेने त्यांना घरात घेत खाण्यासाठी ब्रेड्स आणि फळे दिली. हरणांनी ते सर्व खाल्ले. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला स्वतः हाताने हरणांना खायला घालताना दिसत आहे. पार्क आणि वन्यजीव अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच महिलेवर कारवाई करण्यात आली.

कोलोराडो पार्क अँड वाइल्ड लाइफ्ज नॉर्थ ईस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोलोराडोमध्ये जंगली प्राण्यांना पाळणे बेकायदेशीर आहे. त्यांना फळे आणि ब्रेड खाण्याची सवय नसते. हरणांचा कळप तुमच्या घरापर्यंत जरी आला तरी त्यांना एकटे सोडायला हवे.

हरणांना खायला घालणाऱ्या लोरी डिक्शन म्हणाल्या की, मी दिर्घकाळापासून वेटनरी टेक्शियन असून अनेक प्राण्यांबरोबर वेळ घालवला आहे. जर माझ्याकडे कोणी आले तर त्याला मदतीची गरज आहे व मी त्याला मदत करते. हीच माझी ओळख आहे.

कोलोराडो पार्क अँड वाइल्डलाइफचे म्हणणे आहे की, घराबाहेर हरणांसाठी जेवण ठेवणे इतर प्राणी मनुष्यासाठी देखील धोकादायक आहे. केवळ हरणांसाठीच नाही तर त्यांचा पाठलाग करणाऱ्यांसाठी देखील हे आहे. हरिण सिंहाचे प्रमुख शिकार असते. त्यामुळे जेवणासाठी हरिण एखाद्या वस्तीपर्यंत आले तर सिंहासारखे हिंसक प्राणी तेथे येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment