यामुळे द्रौपदी होती ५ भावांची पत्नी


नवी दिल्ली: आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी द्वापरच्या कालखंडात भगवान कृष्णाने मोक्षदा शुक्ल एकादशीच्या निमित्ताने महान धनुर्धारी पांडूपुत्र अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या मैदानावर उपदेश दिले होते, तो आहे श्रीमद्भगवद्गीता आहे. संपूर्ण जगामध्ये गीता जयंती नावाने आजचा दिवस साजरा केला जातो. महाभारतमधील सर्वात मोठ्या धर्मयुद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींना आजही तेवढेच महत्व आहे. महाभारतमध्ये पांडवांसह द्रौपदी हे एक महत्त्वाचे चरित्र आहे. आज आम्ही तुम्हाला द्रौपदीशी निगडीत अशी काही गोष्ट सांगणार आहोत ती फारच थोड्या लोकांना माहिती आहे. द्रौपदी ५ भावांची (पांडव) का झाली होती बायको; याचे कारण जाणून घेऊया…

असे मानले जाते की मागील जन्मी द्रौपदीने भगवान शंकर यांच्याकडे १४ गुण असलेला पती मिळो अशी इच्छा व्यक्त केली. परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये इतके गुण असणे अशक्य आहे. अशाप्रकारे भगवान शंकराने त्यांना पाच पतींच्या पत्नीचा आशीर्वाद दिला. यानंतर, द्रौपदीने शंकरामधील ५ गुण पती असलेल्या कौशल, शक्ती, धनुर्विद्या, कौशल्य, सौंदर्य आणि सहनशीलता यांसारखे गुण आहेत. यातील प्रत्येक गुण पांडवांमध्ये होते.

द्रौपदी पांचाल राजा द्रुपदची कन्या होती. जी होमहवन दरम्यान प्रकट झाली होती. द्रौपदी लग्नासाठी स्वयंवर ठेवला होता. अर्जुनने धनुर्विद्याचे उत्तम प्रदर्शन करून द्रौपदीला मिळवले. परंतु द्रौपदीला पांडवांची पत्नी होणे भाग पडले. जेव्हा पांडव द्रौपदीला घेऊन घरी आले तेव्हा त्यांची आई कुंती कामात व्यस्त होती. पांडवांनी त्यांच्या आईला हाक मारली तेव्हा आईने त्यांच्याकडे न बघताच म्हटले की जे घेऊन आला आहात ते आपापसात वाटून घ्या. यानंतर द्रौपदी पाच भावांची पत्नी म्हणून जीवन जगणे सुरु केले.

दक्षिण भारतामध्ये लोकप्रिय मान्यता आहे की द्रौपदी ही महाकालीचा अवतार होती, जिचा जन्म भगवान श्रीकृष्णांच्या मदतीसाठी झाला. एवढेच नाही तर, द्रौपदी अनेक नावांनी ओळखली जाते. त्यांना पांचाली, यज्ञसेनी, महाभारती, सैरंध्रीसारख्या नावांनीही ओळखले जाते.

टीप : यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले असून माझा पेपरने याची सत्यता पडताळून पाहिलेली नाही.

Leave a Comment