पाण्याच्या एका थेंबाने हा जनरेटर करतो 100 एलईडी बल्ब प्रकाशमय

यूनिवर्सिटी ऑफ हाँगकाँगच्या वैज्ञानिकांनी एक असे जनरेटर बनवले आहे, जे पावसाच्या एका थेंबाने शंभर छोटे एलईडी बल्ब प्रकाशमय करू शकतो. उच्च क्षमतेचे हे जनरेटर विद्यूत उर्जा उत्पादन क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

हाँगकाँग यूनिवर्सिटीचे इंजिनिअर आणि प्रोफेसर जुआनकाई वांग यांनी सांगितले की,  ऐकण्यास हे आश्यर्यकारक वाटत असले, तरी हे सत्य आहे. या यंत्राद्वारे 15 सेंटीमीटर उंटीवरून पाण्याच्या शंभर मायक्रोलीटरचा 1 थेंब 140 वोल्ट उर्जा निर्माण करू शकते. हे जनरेटर एक एकावेळी कितीतरी पट उर्जा निर्माण करू शकते.

त्यांनी सांगितले की, या यंत्रात दोन इलेक्ट्रोड असतील. यातील एक अ‍ॅल्यूमिनियम आणि दूसरे पॉलीटेट्राफ्लूरोएथिलीन (पीटीएफई) कोटेड इंडियम टिन ऑक्साइडपासून बनलेले असेल.

पॉलीटेट्राफ्लूरोएथिलीन इलेक्ट्रोडचा उपयोग अधिक महत्त्वाचा आहे. जेव्हा पाण्याचे थेंब पडतात, तेव्हा गरम होईलपर्यंत त्यातून उर्जा निर्माण होईल. सर्वसाधारण यंत्रात याची क्षमता कमी असते. सर्वसाधारण यंत्रामध्ये ट्रायबोइलेक्ट्रिक प्रभावाद्वारे उर्जा निर्माण केली जाते. सर्वसाधरणपणे इंधनाद्वारे इलेक्ट्रोड कमी उर्जा उत्पन्न करते, मात्र या तंत्रामध्ये उर्जा अधिक उत्पन्न करणे शक्य आहे.

उच्च क्षमतेचे हे जनरेटर एकावेळी आपल्या क्षमतेच्या कितीतरी पट अधिक उर्जा उत्पन्न करू शकते. या जनरेटरमुळे पावसाच्या पाण्याचा योग्य तो वापर होईल व वीज निर्माण करण्यास मदत होईल.

 

Leave a Comment