राज ठाकरेंनी एकप्रकारे मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे


मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मनसेच्या कालच्या महामोर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना खडसे म्हणाले, घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचे काम भारतीय जनता पक्ष करतच आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांविरोधात मोर्चा काढून केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.

घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी जो लढा राज ठाकरेंनी सुरु केला आहे, त्याला नक्की प्रतिसाद मिळेल. कारण अनधिकृतपणे या देशामध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांमुळे देशातील कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोटाप्रमाणे नागरी सुविधांवर ताण पडत आहे. राज ठाकरेंच्या मोर्चाची दखल घेऊन राज्य सरकारने घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी त्वरीत पाऊले उचलली पाहिजेत, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारला दिला.

काल (9 फेब्रुवारी) राज ठाकरेंनी प्रचंड मोठा मोर्चा मुंबई शहरात काढला. अभूतपूर्व यश या मोर्चाला मिळाले. याचा अर्थ असा होतो की, देशाबाहेर बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलले पाहिजे, असे जनसामान्याचे मत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

Leave a Comment