जाणून घ्या हळदीची क्रांती घडवणाऱ्या पद्मश्री विजेत्या ट्रिनिटी साईओंबद्दल

2020 च्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 118 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या यादीमध्ये सामान्य व्यक्ती मात्र असामान्य काम करणारे एक नाव म्हणजे मेघालयाच्या आदिवासी शेतकरी ट्रिनिटी साईओ.

52 वर्षीय ट्रिनिटी साईओ यांनी आपल्या राज्यात महिलांच्या नेतृत्वाखालील हळदीच्या शेतीच्या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. ट्रिनिटी यांनी आपल्या राज्यात कृषि क्रांतीच घडून आणली, ज्यामुळे महिलांच्या उत्पन्नात तिप्पटीने वाढ झाली.

साईओ यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी लाकाडोंग हळदीची शेती केली. हे येथील पारंपारिक पीक नाही, मात्र माजी शिक्षिका असलेल्या साईओ यांनी या शेतीचे महत्त्व पटवून दिले.  यानंतर अनेक शेतकऱ्यांनी विविध हळदीच्या प्रजातीची शेती करण्यास सुरुवात केली. 2003 साली लाकाडोंग हळदीची लागवड केली व यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. यानंतर त्यांनी या हळदीची लागवड करण्यासाठी इतरांना देखील सांगितले.

स्पायसेस बोर्डाने (वाणिज्य व उद्योग मंत्रालय) ट्विट केले की, ट्रिनिटी साईओ या एक प्रगतीशील विचाराच्या शेतकरी आहेत, ज्यांनी मेघालयाच्या जैनतिया टेकड्यांवर स्वदेशी हळदीचा प्रकार लाकडोंगची लागवड करण्यास व याची लोकप्रियता वाढवण्यासाठी हजारो शेतकऱ्यांचे नेतृत्व केले.

ट्रिनिटी साईओ या मेघालयाच्या जैनतिया हिल्स येथील मुलियाह या गावात राहतात. त्या महिलांना सेंद्रीय प्रमाणपत्र, मार्केटिंग आणि सबसीडीसाठी कागदपत्रे मिळणवण्यास देखील मदत करतात.

Leave a Comment