आपल्या आहारामध्ये मोडविलेल्या कडधान्याचे फायदे


कडधान्ये अंकुरित केल्याने, म्हणजेच त्यांना मोड आणून मग त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. मोडविलेल्या कडधान्यामध्ये प्रथिने मुबलक मात्रेमध्ये असतात. जर अश्या कडधान्याचे रोज सेवन केले तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. कडधान्ये किंवा धान्य अंकुरित करून घेतल्याने त्यांच्यातील पोषक द्रव्ये अधिक प्रमाणात मिळतात. म्हणूनच सकाळच्या नाश्त्यामध्ये अंकुरित धान्य खाण्याचा सल्ला आहारतज्ञ देत असतात.

धान्य अंकुरित किंवा मोड आणण्याच्या प्रक्रियेने त्यातील क्षार आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते. तसेच जीवनसत्वे आणि इतर पोषक तत्वे ही या मध्ये असतात. मोडविलेले कडधान्य पचण्यास ही हलके होते. मोडविलेल्या कडधान्यामध्ये स्टार्च ची मात्र अगदी कमी असते, त्यामुळे याच्या सेवनाने शरीरामध्ये चरबी वाढत नाही. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी मोडविलेल्या कडधान्याचा समावेश आपल्या आहारामध्ये करायला हवा.

मोडविलेल्या कडधान्यामध्ये एनझाइम्स अधिक मात्रेमध्ये असल्याने मेटाबोलिक प्रोसेस चांगली राहते. तसेच शरीरातील इतर रासायनिक प्रक्रियाही सुरळीत चालू राहतात. यामध्ये फायबरची मात्रा मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळे शरीराची पचनक्रिया चांगली राहते. स्प्राउट्स मध्ये लोह आणि तांब्याची मात्रा अधिक असल्याने शरीरामध्ये (रेड ब्लड सेल्स) लाल रक्तकोशिकांची मात्रा वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारून सर्व अवयवांना मुबलक मात्रामध्ये प्राणवायूचा पुरवठा होत्तो. यामुळे सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते.

मोडविलेल्या कडधान्यामध्ये क जीवनसत्व असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळावते. त्यामुळे लहान सहान आजारपण सहजासहजी येत नाही. तसेच अन्य जीवनसत्वे व प्रथिने यामध्ये भरपूर मात्रेमध्ये असल्याने ह्याचे सेवन डोळे, त्वचा, केस या सर्वांच्याच आरोग्यासाठी लाभकारी आहे. यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्सही असल्याने यांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. मोडविलेल्या कडधान्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्टेरोलची मात्रा कमी होऊन धमन्यांमध्ये अडथळे दूर होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment