‘लव्ह आज कल २’मधील आणखी एक नवे कोरे गाणे तुमच्या भेटीला


नुकतेच अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या आगामी ‘लव्ह आज कल २’ मधील तिसरे अत्यंत भावनाप्रधान गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे मेहरमा असे बोल आहेत. इर्शाद कामिल यांनी प्रितमने संगीतबध्द केलेले मेहरमा हे गाणे लिहिले असून हे गाणे दर्शन रावल आणि अंतरा मित्रा यांनी गायले आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ३ मिनीटे आणि १५ सेकंदाच्या या गाण्यात जुन्या आठवणीत रमलेले दिसतात. दोघे एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतरचे हे अत्यंत भावनाप्रधान गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की. दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचाच हा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment