जख्मी प्रवाशाला वाचविण्यासाठी उलटी नेली रेल्वे

महाराष्ट्रात चालत्या रेल्वेतून खाली पडलेल्या जख्मी प्रवाशासाठी  लोको पायलटने रेल्वे उलटी चालवल्याची घटना समोर आली आहे. लोको पायलटने जवळपास अर्ध किमीपर्यंत रेल्वे उलटी चालवली व प्रवाशाला रेल्वेमध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये पोहचवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाराष्ट्रातील भुसावळ डिव्हिजन पचोरा आणि माहेजी स्टेशनदरम्यान एक प्रवासी  खाली पडला. रेल्वेच्या गार्डने ही घटना पाहिली व त्वरित लोको पायलटला याबाबत माहिती दिली. त्यानंतर लोको पायलटने बेशुद्ध व्यक्तीला घेण्यासाठी 500 मीटरपर्यंत रेल्वे उलट्या दिशेने चालवली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जख्मी व्यक्तीची सध्या व्यवस्थित आहे.

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी देखील ट्विट करत रेल्वे कर्मचाऱ्यांचे या कामगिरीसाठी कौतूक केले.

https://twitter.com/KumarShanuSriv1/status/1225460199194009606

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, युजर्सनी देखील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची कौतूक केले.

Leave a Comment