सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास नकार


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास नकार दिला असून यावर आता येत्या 17 मार्चला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.

सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मराठा समाज आरक्षणास स्थगिती देण्यास नकार देत आता या प्रकरणात अंतिम सुनावणी येत्या 17 मार्च रोजी होईल. याचिकेमध्ये म्हटले होते की, इंदिरा सहानी प्रकरणात संविधान पीठाकडून देण्यात आलेल्या आरक्षणाच्या 50% कोट्याचे उल्लंघन करण्यात आले आहे.

शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. अगोदर मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बुधवारी झाली.

Leave a Comment