व्हायरल : जापानी मुलीचा भारतीय भाषा बोलतानाचा व्हिडीओ पाहिला का ?

काही लोकांना अनेक परदेशी भाषा बोलता येतात. मात्र एखादी परदेशी व्यक्ती भारतीय भाषा बोलताना आढळतात तेव्हा सगळ्यांनाच आश्यर्याचा धक्का बसतो. अशाच एका जापानी मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती खूप चांगल्यारित्या बांग्ला भाषा बोलत आहे.

या व्हिडीओला अपूर्ब दास या युजरने फेसबूकवर शेअर केले असून, ज्यात सकुरा नावाची जापानी मुलगी बंगाली बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगत आहे की, तिची आवडती भाषा बंगाली आहे.

A Japanese girl who loves Bengali more than many Bongs …

Posted by Apurba Das on Friday, January 31, 2020

व्हिडीओ शेअर करताना अपूर्बने लिहिले की, एक जापानी मुलगी जिला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा बंगाली भाषा बोलायला आवडते.

व्हिडीओमध्ये सुरुवातीला ती बंगालीमध्ये सांगते की, माझे नाव सकुरा आहे आणि मी टीसीएस, जापानमध्ये काम करते. मी जाधवपूर युनिवर्सिटीमधून बंगाली भाषेत शिक्षण घेतले आहे. मी हिंदी आणि बंगाली दोन्ही भाषा वाचू व लिहू शकते. मला भाषा विज्ञान आवडते, त्यामुळे मला भाषा शिकण्यास सोपे झाले.

तिने सांगितले की, तिने रविंद्रनाथ टागौर यांचे पुस्तक ‘पोस्टरमास्टर’ वाचले असून, सत्यजीत राय यांचा ‘पाथेर पांचाली’ चित्रपट देखील पाहिला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 10 हजारांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Leave a Comment