भूमीच्या या अदांवर घायाळ झाले चाहते


प्रेक्षकांच्या मनावर आपल्या एकाहून एक सरस भूमिकांनी अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री भूमि पेडणेकर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. चित्रपटांबरोबरच सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असलेली भूमी आपल्या चाहत्यांना कायम आपल्या हॉट आणि सेक्सी अदांनी घायाळ करत असते.


नेहमी सोशल मिडियावर तिचे सेक्सी फोटोज चर्चेत असतात. तिने नुकताच आपला बाथ टबमधील हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने या फोटोमध्ये पांढ-या रंगाचे बाथ रोब्स घातले असून ती यात खूपच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.


भूमी पेडणेकर लवकरच ‘दुर्गावती’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमारने प्रेझेंटर म्हणून ‘दुर्गावती’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. अक्षयने आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत घोषणा केली होती. अक्षयने आपल्या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला आहे. यात चित्रपटाशी निगडीत 5 भूमिका दिसत आहेत. यात प्रत्येकाने आपल्या हातात एक पाटी धरलेली आहे.


याबाबतची घोषणा भूमीने देखील आपल्या ट्विटर हँडलवरून केली आहे. या चित्रपटासाठी उत्साही असल्याचे भूमीने म्हटले आहे. भूमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात ‘हिरो’ ची पाटी आहे. म्हणजेच या चित्रपटात दुर्गावतीची भूमिका भूमी साकारणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Comment