VIRAL: राखी सावंत नासाच्या औषधाने करणार कोरोनाचा खात्मा


बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत ही आपल्या नवनव्या कारनाम्यामुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड अंदाजासोबतच राखी राजकीय क्षेत्रावरही बिनधास्तपणे आपले मत व्यक्त करते. तसे पहायला गेले तर ती नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधत असते.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी राखीने असे काहीतरी शेअर केले की ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. एक व्हिडिओ राखीने शेअर केला आहे, ज्यामध्ये कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी ती चीनला रवाना होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी कोरोना व्हायरसचा खात्मा करण्याचा दावा करत आहे.


चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळे 350 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्लाइटमधील एक व्हिडिओ राखी सावंतने शेअर केला आहे, ती ज्यामध्ये कोरोना व्हायरसचा उल्लेख करीत आहे. या व्हायरसमुळे लोक त्रस्त आहेत. मी चीनला हा व्हायरस संपविण्यासाठी जात असल्याचे राखी म्हणत आहे. त्याचबरोबर तिने नासाहून चीनमधील कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी औषधे आणल्याचा दावा केला आहे. ही औषधे घेऊन ती आता चीनला जात आहे. फ्लाइटमधील या व्हिडिओमध्ये ती चीनमध्ये कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी जात असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये तिने मोदींजींनाही आवाहन केले आहे.

Leave a Comment