‘हा’ अभिनेता होणार ‘धूम 4’चा खलनायक


आता कोणत्या अभिनेत्याला घेऊन स्टाइलिश पद्धतीने चोरीच्या घटना दाखवणारी धूम चित्रपटांची सिरीज भेटीला येणार, असा प्रश्न प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून पडला होता. याआधी धूम सिरीजच्या 3 चित्रपटांमध्ये जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खानने खलनायक म्हणून आपल्या समोर आले होते. त्यातच मागील खूप दिवसांपासून धूम 4 मध्ये कोण असणार याची चर्चा सुरू आहे. 2018 साली फिल्म इंडस्ट्रीमध्ये रणवीर सिंहकडे ही भूमिका जाणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या नावांची देखील यात चर्चा सुरु होती.


‘खिलाडी कुमार’ या सगळ्यांना मागे टाकत धूम 4 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारची वर्णी लागल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती देणारे एक ट्विट बॉलिवूड अॅनालिस्ट अतुल मोहन यांनी केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय कुमारचे नाव धूम 4 साठी नक्की झाले आहे. याबाबतच्या अधिकृत घोषणेसाठी थोडी वाट पाहूया. त्यांच्या या ट्विटनंतर अक्षय कुमारच्या फॅन्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मिस वर्ल्ड मनुषी चिल्लरदेखील या चित्रपटात दिसणार आहे. तर धूमच्या तिन्ही सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका केलेले अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा कदाचित या धूम 4 मध्ये दिसणार नाहीत.

Leave a Comment