सूर्यवंशीच्या सेटवर ‘स्वच्छ भारत’ अभियानाची नवी ब्रँड अ‌ॅम्बेसडर


लवकरच ‘सूर्यवंशी’ चित्रपटातून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आत्तापर्यंत सोशल मीडियावर या चित्रपटाचे बरेच अपडेट्स शेअर करण्यात आले आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. अक्षयदेखील शूटिंगदरम्यानचे काही धमाल व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याने कॅटरिनाचाही एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. ती सेटवर झाडू घेऊन साफसफाई करताना यामध्ये पाहायला मिळत आहे.


अक्षयने या व्हिडिओला ‘सूर्यवंशीच्या सेटवर ‘स्वच्छ भारत’ अभियानाची नवी ब्रँड अ‌ॅम्बेसडर’, असे मजेदार कॅप्शन दिले आहे. रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामातील ‘सूर्यवंशी’ हा चौथा चित्रपट आहे. अजय देवगन, रणवीर सिंग यांचीही भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर, अलिकडेच जॅकी श्रॉफ यांचीही एन्ट्री झाली आहे. याशिवाय रोहित शेट्टी आणखी कोणते सरप्राईझ देणार, याचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट २७ मार्चला रिलीज होणार आहे.

Leave a Comment