आजही चाहत्यांना घायाळ करत आहे मल्लिका शेरावत


बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या वयाच्या ४३व्या वर्षी देखील अदा घायाळ करणाऱ्या आहे. मल्लिका अत्यंत फिटनेस फ्रिक असून तिच्या सौंदर्याचे रहस्य संतुलित आहार आणि योगामध्ये दडले आहे.

View this post on Instagram

Basking in the Californian sun 🌞 #mood

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on


गेल्या काही दिवसांपासून मल्लिका सतत स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


मी गेल्या ६ वर्षांपासून अयंगर योगाचा अभ्यास करत आहे. मला यामुळे प्रचंड आनंद मिळतो. त्याचबरोबर मानसिक आरोग्यदेखील योगामुळे चांगले राहण्यास मदत होते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असल्याचे सांगत ४३ वर्षीय मल्लिकाने योगाचे महत्त्व पटवून दिले.


मल्लिका अयंगर योगाचे फायदे सांगताना म्हणाली, नियमितरित्या हे योगासन केल्यास तुम्ही कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकता. आपल्याला अयंगर योगा सशक्त बनवतो, असे सांगत तिने अयंगर योगाचे महत्त्व सांगितले.


मल्लिकाने अयंगर योगा करण्यास सुरू केल्यानंतर गोड खाण्यास बंद केले. तिला गोड फार आवडते. पण ती चांगल्या आरोग्यासाठी गोड खात नाही.

View this post on Instagram

Weekending 💦💧#saturdayvibes #weekendmood

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on


कायम शाकाहारी पदार्थांचा मल्लिका तिच्या आहारात समावेश करते. तिला घरी तयार केलेले पदार्थ फार आवडतात.


मल्लिका व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या चाहत्यांची सोशल मीडियावर संख्या देखील फार मोठी आहे.

Leave a Comment