छोट्या पडद्यावरील नागिनीचा सोशल मीडियावर हॉट फुत्कार


सध्या आपल्या सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका नागिन 3 मघील अभिनेत्री करिश्मा तन्ना खूप चर्चेत आहे.


सोशल मीडियावर करिश्मा तन्ना खूपच सक्रिय असते, ती नेहमीच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.


करिश्माने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या बिकिनी फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.


सोशल मीडियावर करिश्माने शेअर केलेल्या या बिकिनी फोटोंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सध्या तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

🌊🌊🌊 🏝🏝🏝

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna) on


करिश्माने समुद्र किनाऱ्यावरील बोल्ड बिकिनी फोटो शेअर करताना त्याला, ‘मेजर मिसिंग’ असे कॅप्शन दिले आहे.


तिचा बॉयफ्रेंड पर्ल पुरीनेही करिश्माच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. करिश्माच्या या बिकिनी लुकवर त्याने हॉट इमोजी पोस्ट केल्या आहेत.

View this post on Instagram

Eat beach sleep repeat 🌊 . #throwback #maldives

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna) on


त्याचबरोबर तिची बेस्ट फ्रेंड आणि निर्माती एकता कपूरने सुद्धा या फोटोंवर कमेंट केली आहे. ‘तू नक्की काय मिस करत आहे असे, तिने विचारले आहे.


दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडी या रिअलिटी शोमधून लवकरच करिश्मा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


ती याआधी एकता कपूरच्या नागिन 3 या मालिकेत दिसली होती. तिने या मालिकेत सुरुवातीला नागिन रुहीची भूमिका साकारल्यानंतर ती मालिकेच्या शेवटी खलनायकी भूमिकेत दिसली होती.

Leave a Comment