अशी आहे लॅम्बोर्घिनीची भारतात लाँच झालेली सुपरकार


आलिशान आणि स्पोर्ट्स कार उत्पादनात अग्रेसर असलेल्या लॅम्बोर्घिनीने आपली Huracan Evo RWD सुपरकार भारतात लाँच केली आहे. सध्याच्या Huracan Evo आणि Huracan Evo Spyder या मॉडेलसोबत नवीन कार उपलब्ध असणार आहे.

5.2 लीटर V10 पेट्रोल इंजिन नव्या लॅम्बोर्घिनी Huracan Evo RWD मध्ये देण्यात आले असून 560 Nm टॉर्क 610 PS क्षमतेचं इंजिन जनरेट करते.

3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग ही कार पकडू शकते असा दावा कंपनीने केला आहे. या कारचा टॉप स्पीड 325 किलोमीटर प्रतितास आहे.

नवीन फ्रंट स्प्लिटर आणि एअर इन्टेक Evo RWD मध्ये देण्यात आले आहे. स्टँडर्ड इव्होपेक्षा वेगळा लूक देण्यासाठी या कारमध्ये वेगळ्या स्टाइलचे रिअर डीफ्युजर देण्यात आले आहे.

अॅपल कार प्ले सपोर्टसह 8.4 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, फुल डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि 19 इंच अलॉय व्हील कारमध्ये आहे.

अनुक्रमे Huracan Evo आणि Huracan Evo Spyder या दोन्ही कारची किंमत 3.73 कोटी आणि 4.1 कोटी रुपये आहे. 3.22 कोटी रुपये लॅम्बोर्घिनी Huracan Evo RWD या कारची एक्स शोरूम किंमत आहे.

Leave a Comment