चहलने सांगितले टोपीखाली दडलेल्या त्या स्ट्रिट डान्सरचे नाव


नवी दिल्ली – न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सुपर ओव्हरच्या थरारात बाजी मारल्यानंतर अखेरच्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडला ‘व्हाईट वॉश’ दिला आहे. दरम्यान, भारतीय संघाचे खेळाडू चौथ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवल्यानंतर सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत होते. आपल्या साथीदारासह मस्ती करतानाचा व्हिडिओ युझवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. दरम्यान शेवटच्या सामन्यानंतर चहलने टोपीमागे दडलेल्या स्ट्रिट डान्सरच्या नावाचा खुलासा केला.

View this post on Instagram

Off field performance on point 🕺

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on


चहलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, शिवम दुबे दिसून येत आहेत. हे सगळे जण डान्स करताना पाहायला मिळत असून या व्हिडिओला मैदानाबाहेरही आमचा चांगला परफॉरमन्स, असे मजेशीर कॅप्शन चहलने दिले होते. दरम्यान, अय्यर, चहल आणि दुबे यांच्यासह आणखी एक खेळाडू या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पण तो टोपी घालून खाली पाहत असल्याने, त्याला ओळखणे कठिण झाले होते. तो चौथा कोण ? याविषयी चर्चा रंगली असतानाच चहलने तो रोहित शर्मा असल्याचे सांगत त्या रहस्यावरुन पडदा उचलला आहे.

Leave a Comment