व्हिडिओ : टीम इंडियाचे हे खेळाडू झाले हे स्ट्रिट डान्सर


वेलिंग्टन – न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सुपर ओव्हरच्या थरारात बाजी मारली. ५ टी-२० सामन्याच्या मालिकेत भारतीय संघ ४-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघ अखेरचा सामना जिंकून न्यूझीलंडला ‘क्लिन स्वीप’ देण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान, भारतीय संघाचे खेळाडू चौथ्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवल्यानंतर सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहेत. आपल्या साथीदारासह मस्ती करतानाचा व्हिडिओ युझवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

View this post on Instagram

Off field performance on point 🕺

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on


श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, शिवम दुबे चहलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. हे सगळे जण डान्स करताना पाहायला मिळत असून या व्हिडिओला मैदानाबाहेरही आमचा चांगला परफॉरमन्स, असे मजेशीर कॅप्शन चहलने दिले आहे. दरम्यान, अय्यर, चहल आणि दुबे यांच्यासह आणखी एक खेळाडू या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पण तो टोपी घालून खाली पाहत असल्याने, त्याला ओळखणे कठिण आहे.

सोशल मीडियावर चहलने व्हिडिओ शेअर केल्यानंतर, तो चौथा कोण ? याविषयी चर्चा रंगली आहे. तो रोहित शर्मा असल्याचा अंदाज काही लोकांनी व्यक्त केला आहे तर काहींच्या मते, तो ऋषभ पंत आहे. काहींनी तर तो कुलदीप यादव किंवा केदार जाधव असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तो चौथा कोण आहे, याचा खुलासा चहलने केलेला नाही.

Leave a Comment