व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवतील हे आयुर्वेदिक उपाय

थंडीमुळे अनेकदा सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव असे अनेक आजार होतात. एकमेकांमुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका देखील असतो. अशा इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हिवाळ्या सर्दी-खोकला, तापापासून लांब राहण्यासाठी काही आयुर्वेदिक टिप्स नक्की पाळल्या पाहिजेत.

आयुर्वेदिक औषधांचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला कोणतेही साइड इफेक्ट्स होच नाहीत. आयुर्वेदमध्ये तुम्ही काय खाता, पिता, कशाप्रकारे खाता या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जाते. अशा आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक उपचार तुम्ही किचनमधील वस्तूंद्वारे देखील करू शकता.

Image Credited – Navbharattimes

तुळशीचा काढा –

तुळस सर्व घरांमध्ये सहज उपलब्ध असते. ही एक आयुर्वेदिक औषधी असून, तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुळशीच्या सेवनामुळे अनेक आजार दूर होतात. तुळशीत अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असते. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पान खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून सुटका होईल. व्हायरल इन्फेक्शन अथवा घशात त्रास होत असेल तर तुम्ही तुळशीचा काढा करून पिऊ शकता.

Image Credited – Navbharattimes

हळद –

हळद गुणकारी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जख्मेवर अनेकदा घरगुती उपचार म्हणून हळद लावली जाते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. हळद दुधात टाकून पिल्याने व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.

Image Credited – Navbharattimes

अश्वगंधा –

अश्वगंधामध्ये कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता आहे. हे सर्दी, कफ, ताप अशा आजारांना सहज दूर करते. जर तुम्ही नियमितपणे अश्वगंधाचे सेवन केले तर तुमची रोग प्रतिकारशक्ती नक्कीच वाढेल. व्हायरल इन्फेक्शनसोबतच तणाव व थकवा देखी अश्वगंधामुळे दूर होतो.

Image Credited – Navbharattimes

आले –

शरीरातील कफ दूर करण्यासाठी आले गुणकारी ठरते. व्हायरल इन्फेक्शन अथवा कफ, सर्दी, घशात त्रास होत असल्यास आल्याचे गरम सूप अथवा पाणी प्यावे. पोट फुगणे, गॅस पकडणे या समस्या देखील आल्यामुळे दूर होतात.

Image Credited – Navbharattimes

तेल –

अनेकदा आपण आजारांकडे लक्ष देतो, मात्र त्वचेकडे दुर्लक्ष करत असतो. तणाव, प्रवास, हवामान, कपडे यासारख्या गोष्टींचा त्वचेवर परिणाम होऊन त्वचा उत्तेजित होते व आपण आजारी पडतो. अशावेळी तुम्ही केसांप्रमाणेच त्वचेवर देखील तेल लावून हलक्या हातांनी मालिश करू शकता. यामुळे व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment