तुम्ही पाहिले आहे ‘लव्ह आज कल २’चे नवे गाणे


इम्तियाज अली दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन आणि सारा अली खान अभिनीत ‘लव्ह आज कल २’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर त्यातील गाणीदेखील सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. सारा आणि कार्तिकच्या जोडीची या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच तरुणाईत क्रेझ वाढत आहे. अशातच त्यांचा धमाल डान्स असलेले एक नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

नुकतेच ‘लव्ह आज कल २’ मधील ‘हां मै गलत’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. अरिजीत सिंग आणि शास्वत यांनी या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. तर, याला संगीत प्रितम यांनी दिले आहे. या गाण्याचे बोल इरशाद कामिलने लिहिले आहेत. हे एक पार्टी थिम असणारे गाणे आहे. सारा अली खान, कार्तिक आर्यन आणि आरुषी शर्मा यांच्या धमाल डान्स स्टेप या गाण्यात पाहायला मिळतात. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment