आनंद एल. राय यांच्या आगामी ‘अतरंगी रे’मध्ये अक्षय, सारासह धनुषची वर्णी


अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष यांची सुप्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात वर्णी लागली आहे. या आगामी चित्रपटाचे ‘अतरंगी रे’ असे नाव असून नुकतेच चित्रपटातील या तिघांचे फर्स्ट लुकदेखील रिलीज करण्यात आले आहेत.

सारा अली खान या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि धनुष हे पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. अक्षयने एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की आपल्याला या चित्रपटाची कथा एवढी आवडली की अवघ्या १० मिनिटांमध्येच त्याने या चित्रपटासाठी होकार कळवला होता. त्याने या चित्रपटातील भूमिका आव्हानात्मक असल्याचेही सांगितले. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच माझे पात्र असल्यामुळे या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले.

ए. आर. रेहमान यांचे संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. तर, या चित्रपटाची कथा हिमांशू शर्मा यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांच्या टी सीरिजअंतर्गत केली जाणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला मार्च महिन्यात सुरुवात होणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.

Leave a Comment