‘मैदान’ चित्रपटातील अजय देवगनचा फर्स्ट लूक रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला फुटबॉल खेळाचा रंजक सूवर्णकाळ उलगडणारा ‘मैदान’ चित्रपट येणार आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. अजय देवगन या चित्रपटात फुटबॉल परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच सोशल मीडियावर त्याचा देखील फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.


अजय देवगन ‘मैदान’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘बधाई हो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमित रविंद्रनाथ शर्मा यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामनी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, गजराज राव यांचीही यामध्ये भूमिका पाहायला मिळणार आहे.


भारतीय फुटबॉलचा १९५२ ते १९६२ हा सुवर्ण काळ मानला जातो. याच काळातील फुटबॉल स्पर्धेचा थरार या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळेल. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सैविन कुद्रास आणि रितेश शाह यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि बोनी कपूर, अकाश चावला आणि अर्णव जॉय सेनगुप्ता यांनी केली आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment