राखी सावंतचा नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी रामबाण ईलाज


सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या कायद्याविरोधात देशभरात आंदोलन केली जात आहेत. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग असो वा उत्तर प्रदेशातील लखनऊ किंवा दक्षिण भारतातील केरळ राज्य असो, सर्वत्र आवाज उठवला जात आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने यासंदर्भात नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तिने रामबाय ईलाज सुचवला आहे.

याबाबत राखीने असा सल्ला दिला की, माझ्याकडे एक रामबाण ईलाज आहे. जे सीएए आणि एनआरसीला घाबरत आहे आणि त्यांना असे वाटते की, त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांने जन्म प्रमाणपत्र ठेवले नाही. मग तुम्ही का चिंता करता? जर आपल्याकडे जुनी कागदपत्र नसतील तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही सर्व भारतात राहा आणि खूप कर्ज घ्या. तुम्ही भारतीय आहात हे बँक सिद्ध करेल. मित्रांनो चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. सध्या सोशल मीडियावर राखी सावंतचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला नेटकरी खूप प्रतिसाद देत आहेत.

Leave a Comment