अंतराळात पर्यटकांसाठी असे असेल नासाचे ‘स्पेस होम’

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पर्यटकांसाठी स्पेस होम तयार करणार आहे. यासाठी नासाने टेक्सास येथील स्टार्टअप एक्झियम स्पेससोबत करार केला आहे. ही कंपनी व्यावसायिक वापरासाठी स्पेस स्टेशनशी जोडणारे एक मॉड्यूल डिझाईन करेल. हे मॉड्यूल 2024 पर्यंत तयार होईल.

Image Credited – Bhaskar

एक्झियम स्पेसने या संदर्भात कॉन्सेप्ट फोटो रिलीज केला आहे. नासाने सांगितले की, एक्झियम सिगमेंटमध्ये तीन मॉड्युल्स, नोड मॉड्युल, रिसर्च अँड मॅन्युफेक्चरिंग फॅकल्टी मॉड्यूल असेल यातील पहिले मॉड्यूल 2024 पर्यंत लाँच केले जाईल. हे सेगमेंट स्पेस स्टेशनशी सहज जोडले जाईल व वेगळे होऊ शकते. नासाने मागील वर्षीच घोषणा केली होती की 2020 नंतर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पर्यटकांना पाठवण्याची योजना आहे.

Image Credited – wionews

हे अंतराळातील आतापर्यंत सर्वात मोठे निर्माण असेल. राहण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या क्रू क्वार्टर्समध्ये आतील बाजूस भिंत असेल. यासोबत वाय-फाय,  व्हिडीओ स्क्रिन,  एलईडीज लाईट्स, आरसा आणि ग्लास विंडो देखील असेल. यात वेगवेगळ्या ठिकाणी रेलिंग लावलेली असेल, जेणेकरून शून्य गुरुत्वाकर्षणात थांबण्यासाठी त्याचा वापर करता येईल. ग्लास विंडोद्वारे पर्यटक अंतराळात पाहू शकतील. ऑब्जर्वेटरी विंडोद्वारे पृथ्वीला 360 डिग्री पाहता येईल. ही विंडो एक्झियम सिगमेंटच्या सर्वात खालील बाजूला असेल.

Leave a Comment