मिथाली राजच्या बायोपिकाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज


लवकरच रुपेरी पडद्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू आणि कर्णधार मिथाली राजचा बायोपिक झळकणार असून नुकतेच ‘शाब्बास मिथू’ असे शीर्षक असलेल्या या बायोपिकचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

मुख्य भूमिकेत अभिनेत्री तापसी पन्नू असून तिचा पोस्टरमध्ये लूक हुबेहुब मिथाली राजसारखा दिसत आहे. यापूर्वी महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारित बायोपिक आला होता. त्यानंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस भारताने १९८३ साली जिंकलेल्या विश्वचषकाच्या पराक्रमाची गाथाही येणार आहे. त्यातच आता भारतीय महिला संघाची झुंझार खेळाडू मिथालीचा बायोपिक येत आहे.


वायकॉम १८ स्टुडिओच्या वतीने ‘शाब्बास मिथू’ चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. तर याचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करतील. हा चित्रपट ५ फेब्रुवारी २०२१ ला रिलीज होईल.

Leave a Comment