कोरोना व्हायरसबद्दल जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

सध्या कोरोना व्हायरसने चीनसह अनेक देशात थैमान मांडले आहे. कोरोना व्हायरस आणि विषाणूंचे एक कुटुंब आहे. याचे नाव कोरोना मायक्रोस्कोपद्वारे याला पाहिल्यानंतर ठेवण्यात आले आहे. हा विषाणू गोल आकाराचा असतो व त्याचा पृष्ठभाग मुकुटाप्रमाणे दिसतो. ज्यात काट्यांसारख्या गोष्टी दिसतात.

सामान्य लक्षण –

ताप, खोकला, श्वास घेण्यास अडचण, श्वास फुलने, डायरिया, पाचक संबंधित समस्या

गंभीर प्रकरणात लक्षणे –

निमोनिया, श्वास घेण्यास अधिक समस्या निर्माण होणे. मुत्रपिंड निकामी होणे व मृत्यू देखील होऊ शकतो. कोरोना व्हायरस हा साथीचा रोग आहे. याचा संसर्ग लगेच होतो.

कोरोना व्हायरसची लक्षणे असलेल्या व्यक्तीला 14 दिवस त्रास होतो. काही प्रकरणात या आजाराची लक्षणे देखील दिसत नाहीत व शरीराला आतून नुकसान होत असते. एका व्यक्तीपासून हा आजार दोन ते तीन लोकांना होऊ शकतो. व्हायरसच्या तपासासाठी रिअल टाइम पॉलीमीरेज चेन रिएक्शनद्वारे तपास केला जातो. कोरोना व्हायरसच्या तपासासाठी स्वॅब, कफ अथवा रक्ताची तपासणी होते.

जगभरात आतापर्यंत या व्हायरसची लागण झालेली 2798 प्रकरणे समोर आली असून, यातील सर्वाधिक 2761 प्रकरणे एकट्या चीनमधील आहेत.

चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या 500 पेक्षा अधिक भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांना भारतात आणल्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल व तपासणीनंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment