काहीही बोलण्याआधी आता मी ५० वेळा विचार करतो : अजित पवार


अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यात आपल्या बिनधास्तपणे बोलण्याच्या शैलीमुळे ओळखले जातात. पण ते अनेकदा याच बिनधास्त शैलीमुळे अडचणीतही आले आहेत. पण आता ते त्यामुळे बोलताना अत्यंत काळजीपूर्वक बोलतात. स्वतः अजित पवारांनीच याबद्दल सांगितले. अनेकदा ध चा मा केला जातो. त्यामुळे मी आता काहीही बोलण्याच्या आधी पन्नास वेळा विचार करतो, असे ते म्हणाले. शंका-कुशंका निर्माण होणार नाही, वाद निर्माण होणार नाही हे लक्षात घेऊन सर्व गोष्टी तोलूनमापून बोलाव्या लागतात, असेही ते म्हणाले.

अमरावतीत पत्रकारांशी अजित पवार बोलताना त्यांना सरकारमधून बाहेर पडण्याविषयी जे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले, त्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. ते यावर म्हणाले, बाकीच्यांनी बोलून काहीही उपयोग नाही. आम्ही राज्याच्या हितासाठी किमान समान कार्यक्रमावर काम करण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पाठिंबा आहे तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही.

Leave a Comment