Video : न्हाव्याने केस कापण्यासाठी चक्क डोक्यावर लावली आग

टिकटॉकवर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये न्हावी अगदी थरारक अंदाजात मुलाचे केस कापत आहे. न्हावी चक्क ग्राहकाच्या डोक्यावर आग लावतो व कंगव्याने केस सेट करतो.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, न्हावीने मुलाच्या खांद्यावर टॉवेल ठेवला आहे व केसांना जेल लावले आहे. त्यानंतर न्हावी लायटरने ग्राहकाच्या केसांना आग लावतो व कंगव्याने केसांना मागील बाजूला सेट करत आहे. हळूहळू आग आपोआप विझून जाते. टिकटॉकवर हा व्हिडीओ  ‘Prakash_zone143’ नोव्हेंबरमध्ये शेअर केला आहे.

https://twitter.com/JoshuaGrubbsPhD/status/1221605395061530627

टिकटॉकनंतर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, ट्विटरवर या व्हिडीओला तब्बल  13 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडीओ कधीचा व कुठला आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र युजर्सनी हा व्हिडीओ भारतामधील असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment