आगामी ‘हेलमेट’मध्ये जमणार अपारशक्ती खुराना-प्रनुतनची जोडी


आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये अभिनेता अपारशक्ती खुराना सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दिसला होतो. त्याची सहाय्यक अभिनेता म्हणून बरीच लोकप्रियता आहे. आता तो पहिल्यांदा आगामी ‘हेलमेट’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री प्रनुतन बहलचीही भूमिका पाहायला मिळणार आहे.


‘नोटबुक’ चित्रपटातून प्रनुतन बहलन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिच्या या चित्रपटातील भूमिकेचे कौतुकही करण्यात आले होते. आता ती ‘हेलमेट’ चित्रपटातून अपारशक्तीसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

• my special one • #Helmet 💕

A post shared by Pranutan Bahl (@pranutan) on


‘हेलमेट’ चित्रपटाचे अलिकडेच शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाची निर्मिती डीनो मोरिया प्रोडक्शन हाऊसमध्ये करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रॅप अप पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरीमध्येही एक फोटो शेअर करुन प्रनुतनने शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. रोहन शंकर यांनी ‘हेलमेट’ या चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर सतराम रमानी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वाराणसी येथे या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. अपारशक्तीनेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अडल्ट कॉमेडी असल्याचा अंदाज या टीझरवरून येतो.

Leave a Comment