शाहरुखच्या ‘या’ वक्तव्याचे नेटकरी करत आहेत कौतुक


काल देशभरात ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. देशभरातील नागरिकांना सर्वच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आप्तस्वकियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा एक व्हिडिओ या सर्वांमध्ये सध्या व्हायरल होत आहे. नेटकरी त्याच्या व्हिडिओची प्रशंसा करत आहेत.


‘डान्स प्लस ५’ या रिअ‌ॅलिटी शोमध्ये अलिकडेच शाहरुख खानने हजेरी लावली होती. त्याने या कार्यक्रमादरम्यान केलेले एक वक्तव्य सध्या नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. हिंदू – मुस्लिम असा कोणताही भेद नसतो, आपण सर्व भारतीय आहोत. माझी पत्नी हिंदू आहे. मी मुसलमान आहे आणि माझी मुले ही भारतीय आहेत. सुहाना जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या शाळेत एका फॉर्मवर धर्म लिहायचा होता. तेव्हा तिला मी सांगितले, की आपण भारतीय आहोत. आपला दुसरा कोणताही धर्म नाही, असे शाहरुखने या व्हिडिओत म्हटले आहे. बॉलिवूडमध्ये रोमान्सचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खऱ्या आयुष्यातही आपल्या कुटुंबाची जबाबदारी अगदी योग्य प्रकारे पार पाडत आहे.

Leave a Comment