‘शुभ मंगल ज्यादा सावधान’चे पहिले वहिले गाणे रिलीज


काही दिवसांपूर्वीच आयुष्मान खुरानाच्या आगामी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चा ट्रेलर रिलीज केल्यानंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे ‘गबरू’ रिलीज करण्यात आले आहे. हे गाणे इतर गाण्यांपेक्षा वेगळे असून त्याला हटके टच देण्यात आला आहे.

हे हनी सिंगच्या पंजाबी हिट गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन असून हे गाणे रोमीने गायले असून हे गाणे तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे. एक लग्न या गाण्यात दाखवण्यात आले आहे. आयुष्मान खुराना आणि त्याचा चित्रपटातील पार्टनर जितेंद्र कुमार ‘गबरू’ गाण्यावर मनोसोक्त नाचताना दिसत आहेत.

आयुष्मान आणि जितेंद्रची अनोखी केमिस्ट्री गाण्यात दिसत असून या दोघांची जोडी तोडण्याचा गजराज यादव पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत. आयुष्मान आणि जितेंद्र या गाण्यात एकमेकांसोबत डान्स करताना दिसतात. एकीकडे गजराज अथक प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे जितेंद्रची नजर आयुष्मानवरून हटत नाही. या गाण्याच्या शेवटी दोघे किस करतात. हा चित्रपट समलैंगिक विषयावर भाष्य करतो. आयुष्मान खुराना यात पहिल्यांदा समलैंगिक मुलाची भूमिका वठवताना दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २१ फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

Leave a Comment