महिंद्रांनी शेअर केलेला हा व्हिडीओ प्रत्येक भारतीयाने पहायलाच हवा

काल देशभरात 71 वा प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा दिवस आनंदाने साजरा केला. विविध पद्धतीने लोकांना देशाप्रती असलेले आपले प्रेम दर्शवले. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक दोन्ही पाय नसलेला तरूण खांबावर चढत आहे. त्याच्या हातात कोणताही ध्वज नाही. मात्र त्याने तिरंग्याचे शर्ट घातलेले आहे. जेव्हा हा तरूण हवेत अडवा लटकतो, तेव्हा जणू तिरंगाच फडकत आहे असे वाटते.

महिंद्रांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मी हा व्हिडीओ कालच पोस्ट केला असता, मात्र मला हा व्हिडीओ सकाळी आला. आपल्या प्रेरणा देणारी गोष्ट पाहण्यास कधीच उशीर होत नाही. असे काहीतरी जे स्वतःला स्वतःबद्दल वाईट वाटून घेण्यास थांबवते. असे एखादे काहीतरी आपल्याला मोठी गोष्ट करण्याची इच्छा देते.

https://twitter.com/rajivazad/status/1221660591292465152

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment