…यामुळे अजित पवारांनी नाकारली शिवथाळी


पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून ११ ठिकाणी प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात पार पडला. पण, अजित पवार यांनी यावेळी शिवथाळी नाकारली. पण, त्यांनी असे करण्यामागचे योग्य कारणही दिले.

आमची सत्ता राज्यात येताच गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी आणणार, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्या घोषणेनुसार पुण्यात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आले. अजित पवार यांनी यावेळी उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधला.

उद्घाटनानंतर काही पत्रकारांनी दादा थाळीची टेस्ट करा असा, आग्रह केला. अजित पवार यांनी त्यावर आपल्या खास शैलीत उत्तर देत शिवभोजन थाळी नाकारली. ते म्हणाले की, मी जेवलो तर तुम्ही लगेच ब्रेकिंग चालवाल. अजित पवार यांनी गरिबाच्या थाळीवर ताव मारला. अजित पवारांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अजित पवार पुढे म्हणाले की, पण एवढ्या लवकर मी जेवत नाही, आरे मी दीक्षित डायटवर आहे.

Leave a Comment