या वंडर गर्लचे इंग्रजी ऐकून इंग्रज देखील इंग्रजी बोलणे सोडून देतील


नवी दिल्ली: मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा आशयाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. तुम्ही कधी ऐकले आहे की कुणीतरी फाडफाड इंग्रजी बोलून तुमची बोलती केली आहे. पण भारतातील एका छोट्या खेड्यातील मुलगी भल्याभल्याना इंग्रजी बोलून गार करत आहे. ज्यावेळी इंग्रजी बोलण्यासाठी येते भल्याभल्यांची बोबडी वळते. हरयाणातील समालखेच्या मालपूर गावात राहणारी १३ वर्षीय जान्हवी पंवार ही 8 भाषा बोलू शकते. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. लोक या मुलीला वंडर गर्ल म्हणून संबोधत आहेत. पण तिला का वंडर गर्ल म्हणत आहेत याचे कारण जाणून घेऊया.

जान्हवीला का म्हणतात वंडर गर्ल
* जान्हवी वयाच्या १३व्या वर्षी १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
* हरियाणवी, हिंदी, अमेरिकन, फ्रेंच, जपानी, ब्रिटिश अशा अनेक भाषा बोलण्यात आणि समजण्यास सक्षम आहे.
* अमेरिकन व ब्रिटिश भाषांमध्ये टीव्ही ऍन्कर्स सारख्या जान्हवी बातम्या वाचू शकते.
* ८ राज्यांच्या आयएएस अधिका-यांना १२ वर्षांच्या जान्हवीने संबोधित केले आहे.
* १ वर्षात दोन परीक्षा उत्तीर्ण होऊन १३ व्या वर्षी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे जान्हवी.

जान्हवी जेव्हा दोन वर्षांची होती तेव्हा तिचे वडील तिला इंग्रजीमध्ये फळे आणि भाज्या व प्राण्यांचे नाव शिकवले. तेव्हापासून जान्हवीच्या इंग्रजी बोलण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर प्रत्येक वेळी ती फक्त इंग्रजीत लोकांशी बोलतेत. त्यानंतर तिने हळूहळू पूर्ण इंग्रजी भाषा आत्मसात केली.

तिने इंटरनेटवर विविध भाषांचे व्हिडिओ क्लिप पाहून इतर भाषा शिकण्यास सुरुवात केली आणि ती आताच्या घडीला ८भाषा बोलण्यास सक्षम आहे. अमेरिकन आणि ब्रिटीश अॅक्सेंट शिकण्यासाठी ती इंग्रजीच्या बातम्या ऐकत असते. ती आता बारावी उत्तीर्ण झाली असून आता आयएएस बनणे तिचे उद्दिष्ट आहे.

Leave a Comment