दररोज कॉफी पिताना..


सकाळी सकाळी गरमागरम कॉफीच्या कपानेच आपल्यापैकी अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत असते. कॉफी प्यायल्याने आपले मन, मेंदू दोन्ही सतर्क राहण्यास मदत होतेच, पण त्याशिवाय ही कॉफी अनेक प्रकारे आपल्या आरोग्यास फायदेशीर आहे, ह्याचे ज्ञान फारसे नसते. कॉफीमध्ये चवीप्रमाणे साखर आणि दूध घातले की कॉफीचा स्वाद छान लागतो हे जरी खरे असले, तरी काळी कॉफी, किंवा दूध आणि साखर न मिसळलेली कॉफी जास्त गुणकारी असते. कोणतीही चांगल्या प्रतीची जैविक ( organic ) कॉफी, त्यामध्ये कोणत्याही कृत्रिम चवीची भर न टाकता पिणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. अश्या प्रकारच्या कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन दररोज केले तर ते आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदा पोहोचविते.

सकाळी उठल्यानंतर कॉफी घेतल्याने शरीराचे मेटाबोलिझम चांगले राहते. तसेच शरीरामध्ये उत्साह निर्माण होऊन मेंदू सतर्क राहतो. विशेषतः व्यायाम केल्यानंतर कॉफी घेतल्याने शरीरातील कॅलरीज अधिक प्रभावीपणे खर्च केल्या जातात हे आता शास्त्रीय दृष्ट्याही सिद्ध झालेले आहे.

कॉफीच्या नियमित सेवनाने अल्झायमर डिसीज होण्याची शक्यता सुमारे साठ टक्क्यांनी कमी होते असे निदान शास्त्रज्ञांनी केले आहे. तसेच कॉफीच्या सेवनाने मन प्रफुल्लीत राहते, सतर्क राहते व स्मरणशक्ती ही तल्लख राहते. कॉफीच्या नियमित सेवनाने पार्किंसन्स सारख्या रोगाने ग्रस्त होण्याची शक्यता देखील कमी होते.

कॉफी मुळे मन प्रसन्न राहते असे निदान हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले आहे. त्यामुळे मनामध्ये नकारात्मक विचार येणे, डिप्रेशन या सारख्या तक्रारी ही कमी होतात. जैविक कॉफी मध्ये बी१, बी२, बी३, बी५ ही जीवनसत्वे असून, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी तत्वे असतात, जी मन आणि मेंदू शांत व प्रसन्न ठेवणारे होर्मोन्स शरीरामध्ये सक्रीय होण्यास मदत करतात.

कॉफीच्या नियमित सेवनाने त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता ही सुमारे वीस टक्क्यांनी कमी होते. त्वचेच्या कर्करोगाला रोखणारी अनेक अँटी ऑक्सिडंट्स व फायटोकेमिकल्स कॉफी मध्ये असल्याने ही तत्वे शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून त्वचेचे संरक्षण करतात. त्यामुळे त्वचेचा कर्करोग टाळता येतो. तसेच प्रमाणामध्ये केलेल्या कॉफीच्या सेवनाने लिव्हर सिरोसीस सारखे आजार ही टाळता येतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment