हार्दिक पांड्याची गडकरी अन् फडणवीसांच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी


नागपूर – आपल्या भाषणातून राजकारणाच्या मैदानात भल्या भल्यांची विकेट घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात गोलंदाजीचा मनसोक्त आनंद घेतला. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दोघांनी गोलंदाजी करत उपस्थितांची मने जिंकली. दोन्ही नेत्यांनी नागपुरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी क्रिकेटचा आनंद लुटला.


शुक्रवारी नागपूरात खासदार क्रीडा महोत्सवाची सांगता झाली. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेडाळू हार्दिक पांड्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होत. खासदार क्रीडा महोत्सवात विजयी ठरलेल्या खेळाडूंना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर हार्दिक पांड्या सोबत क्रिकेट खेळण्याचा मोह गडकरी आणि फडणवीसांना आवरला नाही.


हार्दिक पांड्याने गडकरी आणि फडणवीसांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. बॉलवर हार्दिक पांड्याची ऑटोग्राफ (सही) असल्याने हे बॉल थेट प्रेक्षकांमध्ये फटकावण्यात आले. सलग 12 दिवस चालणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवा 39 हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 39 मैदानांवर 31 क्रीडा प्रकार खेळले गेले. या क्रीडा महोत्सवात खेळाडूंनी 7 हजार मेडल्ससह 78 लाख रुपयांची पारितोषिके जिंकली.

Leave a Comment