चक्क अंतराळात बनविण्यात आल्या कुकीज

अंतराळवीरांनी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये कुकीज, चॉकलेट आणि चिप्स बनविण्याची कामगिरी केली आहे. त्यांना हे पदार्थ बनवण्यासाठी डिसेंबरमध्ये विशेष ओव्हन पाठवण्यात आले होते. हे ओव्हन झिरो ग्रेव्हिटीमध्ये देखील काम करते. हे कुकीज बनविण्यासाठी पृथ्वीच्या तुलनेत दोन तास अधिक लागले. याचा प्रयोग इटलीचे अंतराळवीर लूसा परमितानो यांनी केला.

Image Credited – Evening Standard

त्यांनी हिल्टन हॉटेलद्वारे बनविण्यात आलेल्या रॉ फूड मटेरियलला ओव्हनमध्ये शिजवून 5 कुकीज तयार केल्या. या कुकीज दिसायला सर्वसामान्य कुकीजप्रमाणेच आहेत. अंतराळवीरांना या कुकीज पृथ्वीवर पाठवल्या असून, त्यांना ह्युस्टन लॅबमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे. कुकीजला ह्युस्टनच्या एका फ्रोजन लॅबमध्ये स्पेसएक्सूल कॅप्सूल म्हणून बेकिंग पाउचमध्ये ठेवण्यात आलेले आहे.

Image Credited – Insider

लूसा परमिताना यांनी डिसेंबरमध्ये या कुकीज तयार केल्या होत्या. त्यांनी एक-एक करून 5 कुकीज तयार केल्या होत्या. सुरूवातीची कुकीज बेक करण्यासाठी 25 मिनिटे लागली. त्याला 300 फेरेनहाइटवर बेक करण्यात आले होते. मात्र ही कुकीज व्यवस्थित झाली नाही. दुसऱ्या व तिसऱ्या कुकीला देखील अधिक वेळ लागला. चौथी व पाचवी कुकीज चांगल्या पद्धतीने बेक झाली व ती खाण्यायोग्य असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी 2 तासांपेक्षा अधिक वेळ लागला होता.

Leave a Comment