शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटवली


नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी असलेली सुरक्षा हटवण्यात आली असून शरद पवार यांच्यासोबतच 40 जणांची सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक 20 जानेवारी पासून काढले आहे. केंद्रीय गृहखात्याने सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

झेड सिक्युरिटी शरद पवार यांना राज्यात आहे. तीन गार्ड शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी सहा जनपथला होते. जे शिफ्ट मध्ये काम करत होते आणि एक पीएसओ हा देखील होता. पण हे सुरक्षा रक्षक 20 तारखेपासून काढण्यात आले आहेत. हे सुरक्षा रक्षक ड्युटीवर आलेले नाही. तेव्हा सुरक्षा कमी करण्यात आल्याचे लक्षात आले. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबत अधिकृत काहीच केंद्रीय गृहखात्याने कळवले नाही. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शरद पवार यांची दिल्लीतील सुरक्षा हटवली? असा चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी सुरक्षा व्यवस्थेमधील कपातीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. एक्स दर्जाची सुरक्षा सचिन तेंडुलकरला पुरवण्यात येत होती. पण एखाद्या व्यक्तीला दिली जाणारी सुरक्षा कायम स्वरुपाची नसते. वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन सुरक्षेची श्रेणी बदलण्याचा अधिकार राज्य पोलिस प्रशासनाकडे असतो. त्यानुसार सचिनच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र ही सुरक्षा कायम ठेवावी, अशी विनंती सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

Leave a Comment