‘लव्ह आज कल’चे पहिले वहिले गाणे तुमच्या भेटीला


इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव्ह आज कल 2’ हा चित्रपट गुलाबी प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणा-या ‘व्हॅलेनटाईन डे’ ला रिलीज प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले असल्यामुळे प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडूनही अपेक्षा खूप वाढल्या आहेत. नुकतेच या चित्रपटातील एक छान रोमँटिक गाणे ‘शायद’ रिलीज करण्यात आले आहे.

या गाण्यात तुम्हाला सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यनची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळेल आणि सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंह याच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले असून या गाण्याला संगीत प्रितमने दिले आहे.

कार्तिक आणि साराची जोडी या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्यामुळे या चित्रपटासाठी प्रेक्षकही प्रचंड उत्सुक आहेत. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेले वर्षभर रंगल्या होत्या. अप्रत्यक्षपणे दोघांनीही अनेकदा आपले रिलेशनशिप स्टेटस मान्य देखील केल्यामुळे या चित्रपटाबाबतची चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली. प्रेक्षकांची कार्तिक आणि सारा या दोघांना एकत्र काम करताना पाहण्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

Leave a Comment