आले ‘जवानी जानेमन’मधील ‘ओले ओले’चे रिक्रेएटेड व्हर्जन


अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री तब्बू ही जोडी तब्बल 20 वर्षांनंतर स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यांची ही जोडी पुन्हा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते देखील उत्सुक आहेत. त्यातच आता त्यांच्या जवानी जानेमन या चित्रपटात एकेकाळी सैफ अली खानच्या ये दिल्लगी या चित्रपटातील गाजलेले गाणे ‘ओले ओले’ हे पुन्हा एकदा नवीन अंदाजात आपल्यासमोर येणार आहे. नुकतेच हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. सैफचा एक वेगळाच स्वॅग या गाण्यात पाहायला मिळत. या चित्रपटात पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही झळकणार आहे.

सैफच्या जुन्या गाण्याप्रमाणे अनेक मुली या गाण्यामध्ये आजूबाजूला थिरकताना दिसणार आहे. अमित मिश्राने हे गाणे गायले आहे तर तनिष्क बागची याचे रिक्रेएटेड व्हर्जन तयार केले आहे. सन 1994 साली प्रदर्शित झालेला ‘ये दिल्लगी’ या चित्रपटात सैफ अली खान अनेक मुलींच्या गराड्यात ‘ओले ओले’ या गाण्यावर नाचताना दिसला. हे गाणे तेव्हा गायक अभिजीत याने गायले होते, ज्याला त्या वेळी या गाण्यासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला होता.

या गाण्याची त्यावेळी जितकी हवा होती, ती आजही कायम आहे. आता तिच हवा या रिमेक गाण्याची होते का हे लवकरच कळेल. तसेच ब-याच वर्षानंतर अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री तब्बू ला एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्यामुळे, प्रेक्षकांमध्येही ह्या चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता आहे. ह्याआधी सैफ आणि तब्बू ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.

Leave a Comment