शिक्षिकेने हटके पद्धतीने शिकवला 9 चा पाढा, आनंद महिंद्रा, शाहरुख झाले प्रभावित

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. प्रेरणा देणारे व काहीतरी नवीन शिकवणारे व्हिडीओ ते आपल्या युजर्ससाठी नेहमी शेअर करतात. यंदा त्यांनी एक गणिताच्या शिक्षिकेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही शिक्षिका एकदम वेगळ्या पद्धतीने आपल्या बोटांद्वारे 9 चा पाढा शिकवत आहे.

आनंद महिंद्रांनी ट्विट शेअर करत लिहिले की, या शॉर्टकटबद्दल मला माहिती नव्हते. कदाचित जर या माझ्या गणिताच्या शिक्षिका असत्या, तर मी देखील या विषयात हुशार झालो असतो.

आनंद महिंद्रा यांच्यानंतर अभिनेता शाहरूख खान देखील या व्हिडीओवर प्रभावित झाला. त्यांने आनंद महिंद्रा यांचा व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, या साध्या कॅलक्यूलेशनमुळे माझ्या आयुष्यातील किती समस्यांचे निराकरण केले आहे ते सांगू शकत नाही.

या शिक्षिका कोण व कुठल्या आहेत हे मात्र समजू शकले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत लाखो युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

अन्य युजर्सनी देखील या ट्रिकबद्दल ट्विट केले की, ही पद्धत केवळ 9 च्या पाढ्यासाठीच लागू होते. तर काही युजर्स या पाढे शिकण्याच्या या सोप्या पद्धतीमुळे खूपच प्रभावित झाले.

Leave a Comment