गर्भवती महिलांच्या व्हिसावर अमेरिका घालणार निर्बंध

ट्रम्प प्रशासन व्हिसावर काही नवीन अटी लावणार आहे. त्या अंतर्गत बाळांना जन्म देण्यासाठी ज्या महिला अमेरिकेत येतात अशा महिलांना व्हिसा नाकारण्यात येणार आहे. अनेक महिला मुलांना अमेरिकन पासपोर्ट मिळावा यासाठी अमेरिकेत बाळांना जन्म देतात.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच यासंबंधित नियम लागू केले जातील. नवीन नियमांमुळे गर्भवती महिलांना पर्यटन व्हिसावर प्रवास करणे शक्य नसेल. गर्भवती महिलांना अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी काउंसिलर ऑफिसरला काही ठोस कारण सांगावे लागेल.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मजात अमेरिकन नागरिकत्व मिळणाऱ्या मुद्याच्या विरोधात कठोर धोरण अवलंबले आहे. या अंतर्गत गैर अमेरिकन नागरिकांच्या बाळांचा जन्म अमेरिकेत झाल्यावर त्यासोबत मिळणारी नागरिकत्वाचा अधिकार समाप्त केला जाईल. बर्थ टुरिझम अमेरिकेसह परदेशात वाढत चालले आहे.

अमेरिकन कंपन्या यासाठी जाहिरात देखील करतात व हॉटेल्सच्या रुम आणि उपचार संबंधित सुविधेसाठी 80,000 डॉलरपर्यंत वसूल करतात. रशिया आणि चीनसारख्या देशातून अनेक महिला बाळांना जन्म देण्यासाठी अमेरिकेला येतात.

Leave a Comment