राज्यातील शाळांमध्ये रोज तीनदा वाजणार वॉटर बेल


मुंबई : काल राज्य सरकारने ३ महत्त्वाचे निर्णय घेतले. शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक आजार होतात. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळांत वॉटर बेल उपक्रम राबवला जाईल. शाळेच्या मुख्याध्यापकांनी वेळापत्रकात ३ वेळा घंटा वाजवण्याबाबत वेळ निश्चित करावी, मुलांना या वेळेत स्वच्छतागृह वापरण्याची मुभा द्यावी, असा अद्यादेश सरकारने काढला. दरम्यान, जनजागृतीसाठी ‘स्वागत भारतीय प्रजासत्ताकाचे, ध्येय समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाचे’ हा उपक्रम राज्यातील शाळांत राबवला जाईल.

विद्यार्थ्यांच्या मनावर घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही मूलतत्त्वे कोरली जावीत या उद्देशाने येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील शाळांमध्ये दररोज परिपाठावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्याबाबत आगामी अधिवेशनात कायदा करणार असल्याची माहिती मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

Leave a Comment